Thursday, 15 January 2015

सर्वाना मकर संक्रांती च्या हार्दीक शुभेच्या

मकरसंक्रांत हा भारतातील एक सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.  या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.  म्हणजेच या वर्षी ७० वर्षानंतर १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेली आहे.

No comments:

Post a Comment